
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोल याला NIAने घेतले ताब्यात…
नवी दिल्ली: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला आज (बुधवार) अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून, दिल्लीला आणण्यात आले आहे. एनआयएने त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले असून, पटियाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अमेरिकेतून एकूण 200 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यात भारतातील तीन जणांचा समावेश आहे.
गँगस्टर अनमोल हा एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेतील एक वॉन्टेड आरोपी आहे. गेल्या वर्षी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येतही अनमोलचे नाव समोर आले होते. अनमोलला अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तो भारतातील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वॉन्टेड यादीत आहे. एनआयएने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
दरम्यान, सलमान खानला लॉरेन्स टोळीकडून धमक्या मिळाल्या. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने सलमानला वाय+ श्रेणीची सुरक्षा दिली. तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्सने ज्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, त्या 10 जणांच्या यादीत सलमान खान अव्वल आहे. 1998 च्या काळवीट शिकार घटनेमुळे बिश्नोई समुदाय संतप्त आहे, ज्याचा उल्लेख करून लॉरेन्सने टीव्ही मुलाखतीत सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर, 14 एप्रिल 2024 रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.
अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…
मोठा निर्णय! बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित…
मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

