Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी (ता. १३) संध्याकाळी दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी पसरलेला धुर, वाहनांचे चेंदामेंदा झालेले भाग आणि जखमींच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना धडक दिली. कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिड्रोल टँकला आग लागली आणि क्षणार्धात आगीचे लोट दिसू लागले.

सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला देखील कंटेनरने पाठीमागून धडक दिली, कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमध्ये असलेले दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग एवढी मोठी होती की अशा प्रसंगी आम्ही काहीच करू शकलो नाही, असेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे अशक्य काही ठिकाणी सर्व्हिस रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो. अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी उतारावरून ‘न्यूट्रल’ करून वाहन चालवत असल्याने वाहनांवरील ताबा सुटतो.

नवले पूलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही, याआधीदेखील असे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत. महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचे मुख्य कारण असून साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे. याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण आहे, तसेच या ठिकाणीच दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात. तेव्हा तीव्र उतार असल्याने अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटते. समोरच्या वाहनांवर ती अवजड वाहनं जाऊन धडकतात आणि अपघात घडतो. अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, मात्र कोणताही कायमस्वरुपी तोडगा नाही, ही खेदाची बाब आहे.

पुणे! नवले पुलाजवळ ट्रकने तीन वाहनांना दिली जोरदार धडक…

पुणे! नवले पुलावर ट्रकची वाहनांना जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू…

पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!