
Video: खाकी वर्दीतील रणरागिनीने न डगमगता पकडला 18 फुटांचा किंग कोब्रा…
कोझिकोड (केरळ): कोझिकोड जिल्ह्यात अत्यंत धाडसी खाकी वर्दीतील महिला वन अधिकाऱ्याने तब्बल 18 फुटांचा किंग कोब्रा फक्त ६ मिनिटांत रेस्क्यू करत सर्वांनाच चकित केलं. महिला अधिकाऱ्याचं धाडस पाहून सर्वानीच सलाम ठोकला आहे. हे काम केवळ धोकादायक नव्हते तर त्यासाठी संयम, आत्मविश्वास आणि अनुभवाचीही आवश्यकता होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video मध्ये पाहायला मिळते की, महिला अधिकाऱ्याने काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. महिला अधिकाऱ्याने प्रथम संपूर्ण परिसराची काळजीपूर्वक तपासणी केली, नंतर विशेष उपकरणांच्या मदतीने हळूहळू किंग कोब्राला नियंत्रित केले आणि कोणतीही घाई न करता सुरक्षित ठिकाणी सोडले. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नव्हते. हा साप खूप चपळ आणि धोकादायक आहे. तरीही, या महिला अधिकाऱ्याने हे बचाव अतिशय शांतपणे आणि निर्भयपणे पूर्ण केले.
खाकी वर्दीतील रणरागिनीने न डगमगता पकडला 18 फुटांचा किंग कोब्रा…https://t.co/42LUDp6Iqz pic.twitter.com/7bAGTW9JBi
— policekaka News (@policekaka) July 7, 2025
नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर खाकी वर्दीतील रणरागिनीच्या प्रयत्नाचे कौतुक केले. अनेकांनी “रिअल हिरो”, “फिअरलेस फॉरेस्ट गार्ड” आणि “नेचरचा प्रोटेक्टर” अशी नावे दिली. वन विभागानेही या महिला अधिकाऱ्याच्या शौर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. ही घटना वन सेवेतील महिलांच्या सहभागाचे आणि नेतृत्व क्षमतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे विभागाने म्हटले आहे.
Video: युवतीला सहा प्रियकर! एका प्रियकराने सर्वांना रेस्टॉरंटमध्ये बोलावले अन्…
Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…
पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…
View this post on Instagram

