
पोलिसांनाही धक्का! दोन युवक युवतींना सहज आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : दोन युवक युवतींना आपल्या जाळ्यात ओढायचे. मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याची त्यांची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
हिंदू मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मुस्लिम युवकांना बरेली पोलिसांनी अटक केली आहे. नोशाद आणि अमान हे दोघे युवक आपली खरी ओळख लपवून मुलींना फसवत होते. पोलिसांनी या दोन तरुणांची चौकशी केली असता त्यांनी विचारले की, ते मुलींना कसे अडकवायचे? पद्धत ऐकून पोलिसांना धक्काच बसला. हे संपूर्ण प्रकरण इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्मचारी नगरचे आहे.
नोशाद आणि अमान यांच्याकडून 8 बनावट आधार कार्ड आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नोशादकडून हिंदू आणि मुस्लिम नावं आणि फोटो असलेली 5 आधार कार्डे जप्त करण्यात आली आहेत. नोशादने 6 इंस्टाग्राम आयडी तयार केले आहेत, जे हिंदू आणि मुस्लिम नावाने आहेत. या आयडींच्या सहाय्याने तो मुलींना अडकवायचा आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांचे शारीरिक शोषण करायचा. नोशाद नाव लपवून हिंदू मुलींशी अश्लील चॅट करून ब्लॅकमेल करत असे. अमानकडून हिंदू आणि मुस्लिम नावांची 3 बनावट आधारकार्ड सापडली. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे न्यूड व्हिडिओ आणि अश्लील चॅट सापडले.
पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. विशाल तिवारी नावाच्या एका युवकाने सांगितले की, एका दुकानात दोन मुली आणि दोन मुलांमध्ये वाद सुरू होता. मला संशय आल्यावर मी त्यांचे नाव विचारलं. त्यातील एकाने मला त्याचे नाव राहुल असल्याचे सांगितले. यानंतर दोन्ही मुली तिथून निघून गेल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी राहुल आणि सतीश अशी नावे सांगितली. पण, पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी नौशाद आणि अमन अशी त्यांची नावे उघड केली.
दोघांकडून आठ आधार कार्डे जप्त करण्यात आली. या दोन आरोपींनी हिंदू आणि मुस्लिम नावाने बनावट आधार कार्ड बनवले होते आणि ते बनावट इंस्टाग्राम आयडीही चालवत होते. पोलिसांनी या दोघांकडून अश्लील व्हिडिओ आणि चॅटही जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची पोलिस अधिकाऱ्याने काढली अंतर्वस्त्रे अन्…
प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…
प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…
प्रेम, लव्ह मॅरेज अन् प्रेमसंबंध! दादर सूटकेस प्रकरणात पत्नीला अटक…
IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

