
सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
भोपाळ (मध्य प्रदेश) : सोनम हिने हनिमूनसाठी गेल्यानंतर राजा रघुवंशी यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. राजाचा मृतदेह २ तारखेला पोलिसांना सापडला होता. तर सोनम आज (सोमवार) पोलिसांना शरण आली. लग्नाआधीच्या प्रियकरासोबत सोनमला राहायचे होते. परंतु घरच्यांच्या इच्छेखातर तिने राजासोबत लग्न केले होते. त्यामुळे ती फारशी खूश नव्हती. प्रियकर राजसोबत राहण्यासाठी तिने नवऱ्याला मारण्याचा कट रचला.
सोनम आणि प्रियकर राज कुशवाह यांनी मिळून हत्येची योजना आखली. राजने यासाठी कंत्राटी किलर नेमले. राज शिलाँगला आला नाही. तो फक्त सोनमसोबत फोनवरून संपर्कात होता. तीन कंत्राटी किलर शिलाँगमध्येच उपस्थित होते. आकाश, विशाल आणि आनंद यांना सुपारी देण्यात आली. यानंतर सर्वजण चेरापुंजी येथे पोहोचले. सोनमने राजा रघुवंशीला जाणूनबुजून एका निर्जन रस्त्यावर नेले. तिघांनी मिळून खून केला. त्यानंतर, आकाश, विशाल, आनंद आणि सोनम शिलाँगहून गुवाहाटीला गेले. एक दिवस गुवाहाटीत राहिले. पुन्हा तिथून बाहेर पडले आणि वेगळे झाले.
पाच वर्षांनी लहान असलेल्या राज कुशावह नावाच्या प्रियकरासाठी सोनमने तिच्या पतीच्या काटा काढला, तोही लग्न झाल्यानंतर अवघ्या 13 दिवसात. या प्रकरणाची पाहा टाईमलाईन…
10 मे 2025
राजा रघुवंशी यांचा सोनमसोबत विवाह झाला. त्यावेळी काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
20 मे 2025
दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला फिरायला जायचे नियोजन सोनम हिने केले होते.
23 मे 2025
राजा आणि सोनमने मेघालयातील अनेक ठिकाणे पाहिली. नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. या हॉटेलमधून चेकआऊट केल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. ठरल्याप्रमाणे सोनमने सुपारी देऊन राजाची हत्या केली आणि सोनम बेपत्ता झाली
2 जून 2025
मेघालयच्या एका धबधब्याजवळ राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या हातावरचा टॅटू आणि हातातल्या स्मार्टवॉचमुळे त्याची ओळख पटली.
8 जून 2025
मेघालयमधून बेपत्ता झालेली सोनम थेट उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एका ढाब्यावर घाबरलेल्या अवस्थेत दिसली. आपल्या नवऱ्याची काही गुंडांनी हत्या केली असून माझं अपहरण करुन मला गाजीपूरमध्ये आणून सोडल्याचे तिने हॉटेल मालकाला सांगितले. घरी एक फोन करायचा आहे असं सांगून हॉटेल मालकाच्या मोबाईलवरुन तिने फोनही केला. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी तिथून सोनमला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच सोनमने आपला गुन्हा मान्य केला. आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं सोनमने कबूल केले.
नोकरावर प्रेम अन् नवऱ्याचा गेम…
राज कुशवाह नावाच्या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते.
राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात कामाला होता.
सोनम अकाउंट्स आणि स्टाफ मॅनेजमेंटशी संबंधित कामासाठी ऑफिसला यायची.
याच काळात राज कुशवाह आणि सोनम यांच्यात जवळीक वाढली.
सोनमच्या लग्नानंतरही राजसोबत तिचे प्रेमसंबंध कायम होते.
प्रेमासाठी सोनमकडून पतीची हत्या करण्यात आली.
दरम्यान, दुसरीकडे सोनमच्या कुटुंबाने आपली मुलगी निर्दोष असल्याचा दावा केला. या प्रकरणी मेघालय पोलिस खोटं बोलत असून आपल्या मुलीला अडकवलं जात असल्याचा आरोप सोनमच्या वडिलांनी केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक…
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…
हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…

