एअर होस्टेस हर्षिता शर्मा हिचा अपघाती मृत्यू तर मित्र किरकोळ जखमी…

भोपाळ (मध्य प्रदेश): कारसमोर अचानक गाय आल्यानंतर चालकाने ब्रेक मारल्याने मोटार थेट कालव्यात कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात एअर इंडियाच्या एअर होस्टेस हर्षिता शर्मा (वय 21) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

हर्षिता तिच्या दोन मित्रांसोबत फिरायला गेली होती. गाडी चालवणारा मित्र जय म्हणाला की, अचानक एक गाय समोर आली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि कालव्यात पडली. हर्षिताला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज शुक्रवारी सकाळी हर्षिताचा मृत्यू झाला. या अपघातात दोन मित्रांना किरकोळ दुखापत झाली आहे. एअर होस्टेस हर्षिताचे वडील प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, हर्षिता अनेकदा शहराबाहेर राहत असे. हर्षिताने बुधवारी रात्री तिने तिच्या भावाला व्हॉट्सअॅपवर सांगितले होते की ती शुक्रवारी भोपाळला येत आहे. परंतु, ती गुरुवारीच भोपाळला पोहोचली होती. हे आम्हाला माहित नव्हते. हर्षिताची मैत्रिण शिवानीने फोन करून तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली तेव्हा कुटुंबाला अपघाताची माहिती मिळाली. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितले की हर्षिता ब्रेनडेड झाली आहे. शुक्रवारी सकाळी मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षिता गुरुवारी रात्री तिचा मित्र सुजल आणि जयसोबत कोलार परिसरात कारमध्ये फिरत होती. जय गाडी चालवत होता. कोलारमधील होली क्रॉस स्कूलजवळील पुलावर एक गाय गाडीसमोर आली. यावेळी गाडी कालव्यात पडली. जय आणि सुजल यांनी हर्षिताला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…

प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…

Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…

Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!