
महाराष्ट्र पुन्हा हादरला! बिल्डरचे अपहरण अन् नग्र करून पट्ट्याने बेदम मारहाण…
छत्रपती संभाजीनगर: एका बिल्डरसह त्यांच्या साथीदाराचं १५ जणांच्या टोळीने बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्यानंतर आरोपींनी विवस्त्र करत दोघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बिल्डर आणि त्याच्या साथीदाराचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले आणि नग्न करून पट्ट्याने दोघांना मारहाण केली. बंदुकीचा भाग दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. सातारा परिसरातील सुधाकरनगरात ही घटना घडली आहे. शरद राठोड असे मारहाण झालेल्या बिल्डरचे नाव आहे. फिर्यादीने थेट पोलिस आयुक्ताला जाऊन तक्रार करत बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तो गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात वर्ग करून संदीप शिरसाट या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शरद भवसिंग राठोड (वय ३३, रा. कुमावतनगर, देवळाई चौक) हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीची अभिजित ऊर्फ बंटी बर्डे (वय २८) याच्याशी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मैत्री आहे. बंटी पूर्वी आरोपी संदीप शिरसाटकडे शासकीय बांधकामाच्या टेंडरमध्ये सहायक म्हणून काम करत होता. मात्र संदीपकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे त्याने राठोड यांच्या कार्यालयात काम सुरू केले.
६ एप्रिलच्या पहाटे राठोड हॉटेलमधून जेवण करून निघत असताना शिरसाट आणि त्याचा पोलिस कर्मचारी असलेला भाऊ मिथुन, स्वप्निल गायकवाड, हर्षल आणि इतरांनी त्यांना गाडीत बसवून सुधाकरनगर येथील एका कार्यालयात नेले. याठिकाणी आरोपींनी राठोड यांना मारहाण केली. संदीपने राठोड यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘तुला मारून डोंगरात फेकून देतो’ अशी धमकी दिली. यानंतर बर्डेला कॉल करून माझ्या दुचाकीचे पेट्रोल संपले आहे. तू लवकर ये असे सांगण्याचे संदीपने राठोड यांना सांगितले. अभिजित पेट्रोल घेऊन आल्यानंतर संदीपच्या कार्यकर्त्यांनी अभिजितला पकडून आलिशान गाडीमध्ये आणले. त्यानंतर त्यालासुद्धा मारहाण करत त्याचा लॅपटॉप घेतला. अभिजितचे शर्ट आणि पँट जबरदस्तीने काढून घेतले गेले. तिथे दोघांनाही बेदम मारहाण केली.
राठोड यांना जवळपास पाऊण तास मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना देवळाई चौकात आणून सोडून दिले. मात्र अभिजीतला तसेच डांबून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या आसपास आरोपींनी अभिजीतलाही सोडून दिले. या प्रकरणी आता बेगमपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…
पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…
अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा…
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

