प्रेमप्रकरण! युवकाला मारहाण करत घरापर्यंत आणले अन् युवकाने घेतला गळफास…

नांदेड: प्रेमप्रकरणातून युवकास बेदम मारहाण करत ‘तुझी लायकी आहे का पाटलाच्या देशमुखांशी सोयरीक करायची’ असा धमकीचा फोन मुलीच्या काकाकडून युवकाला गेला. गावात बेइज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी दिल्याने युवकाने भीतीपोटी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे घडली आहे. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात युवतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नितीन शिंदे (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. युवकाच्या वडिलांच्या तक्रारी वरुन मुलीसह ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणाच्या कारणावरून नितीन शिंदे याला बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवाय, तुझी लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरपण करायची अशी धमकी युवकाला देण्यात आली होती. यानंतर नितीन शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहराजवळच्या सुगांव येथे गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात मुलीसह सात जना विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शिंदे या तरुणाच थुगांव येथील एका युवतीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. एक वर्षा पूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणा बाबत माहिती झाली होती. मुलीच्या नातेवाईकाकडून युवकाला धमक्या देण्यात आल्या होत्या. 18 मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकानी गावात नितीनला मारहाण करत घरा पर्यंत आणले. पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करुन नितीनला धमकी दिली. तुमची लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरपण करायची. गावात येईन बेइज्जत करतो. चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोन वरून दिली. नितीन शिंदे याने घाबरून गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या धमक्या आणि मारहाणीच्या भीतीतून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने प्रेयसीला मेसेज केल्याचेही समोर आले. तसेच पोलिस तपासात धमकीची क्लिपही समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…

प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!