सख्ख्या भावासह मामाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; राहिली गरोदर…

मुंबई: मुंबईतील वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. एका युवकाने आपल्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. शिवाय, पीडित मुलीवर तिच्या मामाने देखील अत्याचार केला आहे. अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी (वय १६) वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालासोपारा परिसरात आपला मोठा भाऊ (वय १८) आणि मोठ्या मामासोबत राहते. मोठ्या भावाने काही दिवसांपूर्वी पीडित मुलीवर अत्याचार केला होता. अत्याचाराबद्दल कुणाला काहीही सांगू नको नाहीतर तुला जीवे मारेन, अशी धमकी भावाने दिली होती. आरोपीला घाबरून तिने घडलेला प्रकार कुणालाच सांगितला नाही. यानंतर पीडित मुलीच्या मोठ्या मामाने देखील अत्याचार केला आहे. दोन्ही आरोपींनी ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वेळोवेळी अत्याचार केला आहे. याच अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली.

मुलगी गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर मामाने तिचा गर्भपात केला. यानंतर ही अत्याचाराची घटना उघडकीस आली. याप्रकरणी वसई पोलिसांनी पीडितेचा सख्खा भाऊ आणि सख्ख्या मामाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधिक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दहावीत शिकणारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का; आरोपी निघाला…

नोकरी वाचवायची असेल तर मला खूश ठेव म्हणाला अन् गरोदर राहिल्यावर…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…

संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!