कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १४ गायींची सुटका, ठाकरे गटाच्या उपनेत्याविरूद्ध गुन्हा…

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव परिसरात कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या १४ गायींची गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली. मात्र, या कामात त्यांना तेथील इतर लोकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांनी विरोध केला. त्यामुळे पाचुपते यांच्यासह सात जणांविरूद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. महादेवनगर, उरुळीकांचन, ता. हवेली, जि.पुणे) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. कांचन यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पोलिसांच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणत १४ गायींची सुटका केली. या गायींची श्रीगोंद्यात कत्तल करून त्यांचे मांस पुणे-मुंबईला पाठविण्यात येणार होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. कारवाई करताना स्थानिकांनी विरोध केला, पाचपुते यांनी फोनवरून धमक्या दिल्या. गायींना घेऊन जाण्यासाठी आणलेल्या टेम्पो चालकालाही धमकावण्यात आल्याने त्याने गायी नेण्यास नकार देत निघून गेला. त्यामुळे पोलिस आणि गोरक्षकांना पायी चालवत गायींना गावाबाहेर आणावे लागले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे उपनेते पाचपुते यांचेही नाव आल्याने यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. गावचा तंटामुक्ती समितीचे अध्यक्षही यात आरोपी आहे.

गोरक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या मार्फत गोरक्षणाचे काम करणारे कांचन यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ८ मार्चला सकाळी आपल्याला माहिती मिळाली की, श्रीगोंदा येथील गोतस्कर मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी यांनी कत्तल करण्यासाठी जर्सी (संकरित) गायी हिरडगाव परिसरात बांधून ठेवल्या आहेत. गोतस्कर साजन सदाशिव पाचपुते यांच्यामार्फत महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण यांच्या शेतामध्ये गायी डांबून ठेवल्या आहेत. रात्री तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिंदे यांच्या मदतीने श्रीगोंदयात नेऊन कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही श्रीगोंदा पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी गेलो. तेथे विचारपूस केल्यावर महिती खरी असल्याचे समजले. १४ गायी तेथे बांधून ठेवल्या होत्या. आम्ही त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू करताच शारदा महेश चव्हाण हिने तेथे येऊन दमदाटी सुरू केली. आम्ही साजन पाचपुते यांच्या जवळची माणसे आहोत. त्यांना सांगून तुमचा बंदोबस्त करू, अशी धमकी दिली. त्यानंतर तिचे पती महेश चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे यांच्यासह आणखी काही जण तेथे आले. त्यांही विरोध सुरू केला. महेश चव्हाण याने पाचपुते यांना फोन लावून दिला. पाचपुते यांनी कारवाई न करण्यासाठी धमकी दिली. मात्र, आम्ही कारवाई सुरूच ठेवली. पोलिसांच्या मदतीने एक टेम्पो बोलाविण्यात आला. मात्र, पाचपुते यांनी त्यांच्या चालकाला धमकी दिली. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने सहकारी गोरक्षक आकाश अशोक लोंढे, आकाश मधुकर लांडगे, दत्ता ठोंबरे, शुभम मासोळे, आप्पा लोंढे, विकास तरंगे व वैभव खैरे व ऋतिक चौधरी, शुभम तनपुरे यांनी पायी चालत गायी गावाबाहेर घेऊन निघालो. त्यावर जवळील शेतात काही कुरेशी समाजाचे लोक व आदिवासी समाजाचे लोक हातात दगड घेऊन आम्हाला मारु लागले. त्यावेळी श्रीगोंदा पोलिसांनी आणखी मदत बोलावून घेतली. त्यांनी त्या लोकांना बाजूला केले. नंतर वाहनांची सोय करून त्या गायी एक गोशाळेत पोहचविल्या. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी, साजन सदाशिव पाचपुते, महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण व कोकण गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून मध्यरात्रीच्या सुमारास ६ जनावरे गेली चोरीला…

कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांच्या ट्रकला अपघात; ५ जनावरांचा मृत्यू…

कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या दहा वासरांची अपघातामुळे सुटका…

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…

लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!