वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…

वर्धा : वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला असून, अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. वर्धा नागपूर रस्त्यावरूल सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सेलू पोलिस पुढील तपास करत आहेत.

शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि समीर सुटे अशी मृत पावलेल्या तीन मित्रांची नावे आहेत. धनराज धाबर्डे नावाचा युवक जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.

वर्धा येथील रहिवासी असलेले चारही जण गुरुवारी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी नागपूरला गेले होते. पार्टी झाल्यानंतर रात्री उशीरा चारही जण वर्ध्याच्या दिशेने येत होते. वर्धा नागपूर रस्त्यावरील सेलू बायपास रोडवर त्यांच्या कारला अपघात झाला. कार पाच ते सहा वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली. या अपघातात धनराज धाबर्डे नावाचा तरुण देखील गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपुरला हलवण्यात आले आहे.

मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सेलू पोलिस पुढील तपास करत आहेत. वाढदिवसाची पार्टी करायला गेलेल्या तीन मित्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुळजापूरला देवदर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू…

सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…

धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!