
ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल…
नागपूरः ऑनलाइन गेमच्या नादातून एका 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना धंतोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येपूर्वी युवतीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नागपूरमध्ये एका 17 वर्षाच्या मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून घेत गळ्यावर जखम करून आत्महत्या केली आहे. नागपुरातील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ऑनलाइन गेमिंग टास्क मुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. युवती रात्री ऑनलाईन गेम खेळत होती. सोमवारी (ता. 27) सकाळी आई वडील उठल्यावर मुलगी तिच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली. या घटनेमुळे तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीतून आणखी काही उलगडे होण्याची शक्यता असून या घटनेचा पुढील तपास धंतोली पोलिस करत आहेत.
दरम्यान, पीडित मुलगी उत्तम लिखाण करायची आणि विविध विषयांवर तिच्या भावना व्यक्त करायची. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या नादात मुलगा पडल्याचा मेसेज आईने वाचला अन्…
दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…
शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…
सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…

