जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…

धुळे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (मंगळवार) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (जेल रोड) आमरण उपोषण सुरू केले आहे.

चंदू चव्हाण म्हणाले, ‘लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक मागण्यासाठी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. पण, जवानांच्या विषयांकडे कोणीही लक्ष देत नाही. माझा लढा हा एकट्यासाठी नाही तर देशातील जवानांसाठी आहे. देशात जवानांचा सन्मान करण्याचे सोडून उपरे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. जवानांवरील कलंक मिटविण्यासाठी आणि खालील मागण्यांची पूर्तता केंद्र सरकार, राज्य सरकारने करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.’

soldier-chandu-chavan

जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे…
१) जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये. यासाठी ओडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी.
२ सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी, त्यांनी जोपर्यंत देशाची सेवा केली आहे त्याचा मोबदला मिळावा.
३) लष्करातून बडतर्फ केल्याने पोलिस व्हेरीफिकेशेमध्ये बडतर्फ येत असल्याने नोकरी मिळत नाही. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल १६ प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी आर्टिकल २१ प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे.
४) बडतर्फ केलेल्या जवानानंना एक्स सर्विस मॅनचा दर्जा देण्यात यावा.
५) देशातील बडतर्फ केलेल्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहिर करावी.

पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांची लष्करामध्ये ११ वर्षे नोकरी झाली आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. चंदू चव्हाण यांनी देशभर आंदोलन सुरू केले आहे. पाकिस्तानमध्ये असताना मरण आले असते तर एकदाच मेलो असतो. पण, मातृभूमीत आल्यानंतर रोजच्या मरण यातना भोगत आहे. लष्करातून काढल्यानंतर पेन्शन नाही, नोकरी मिळत नाही मग करायचे काय? असा सवालही चंदू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी पाकिस्तान कसा आणि कशासाठी गेलो होतो, हे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगावे असे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.

जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…

Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…

Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे ३ महिने २१ दिवस) पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5014931904232816811?BookName=Javan-Chandu-Chavhan

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!