
नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
नागपूर : प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महेश आणि प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक यांचे प्रेमसंबंध होते. प्रिया हिने महेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, महेश तिला लग्नाच्या विषयावर टाळत होता. शेवटी महेशनचे तिचा खून करून मृतदेह जंगलात पुरला. प्रिया बागडी ही युवती गेल्या सहा वर्षांपासून कुटुंबियांपासून वेगळी राहत होती. प्रिया १६ तारखेपासून बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्याने तिच्या आईने खोलीवर जाऊन पाहिले. मात्र तिथं कुलूप लावलेले होते. शेजाऱ्यांकडे विचारणा केली असता ती आठवड्याभरापासून दिसली नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर आईने पोलिसात तक्रार दिली. प्रियाचा कुठेच शोध लागत नसल्याने तिच्या आईने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी शोध घेतला असता तपासात महेश वळसकर याला ताब्यात घेतले
पोलिसांनी प्रिया हिचे लोकेशन शोधले तेव्हा ती रामटेकमध्ये एका हॉटेलात असल्याचे आढळले. ते हॉटेल आरोपी महेश केशव वळसकरच्या मालकीचे होतं. त्याच्योसबत ८ वर्षांपासून प्रियाचे प्रेमसंबंध होते. महेशच्या हॉटेलमध्ये ती मुक्कामी राहत होती. तिच्यावर महेश पैसे खर्च करत होता. आरोपी महेश विवाहित होता आणि प्रियाने तिच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे शेवटी महेशने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर हॉटेलपासून ३ किमी अंतरावर एका जंगलात मृतदेह पुरून टाकला.
दरम्यान, पोलिसांनी महेशला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. तेव्हा घाबरलेल्या महेशने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची सुद्धा चौकशी करण्यात आली. तेव्हा तिनेही विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांचा महेशवर संशय बळावला आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी; चिमुकलीमुळे हत्याकांडाचा उलगडा…
नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…
पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…
अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…

