‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा; लेखकाचे अपघाती निधन…

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या मनोरंजनात्मक कार्यक्रमातील पडद्यामागचा कलाकार असलेले लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले आहे. याबाबत, लेखन टीममधील सचिन गोस्वामी यांनीच माहिती दिली.

हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले. विजय कुमार विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनाचे बारकावे हेरणारे मराठवाड्यातील एक होतकरू लेखक होते. ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्र, हास्यजत्रा टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा टीम त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेत सहभागी आहे. विजयकुमार याना भावपूर्ण श्रद्धांजली, असे फेसबुक पोस्ट सचिन गोस्वामी यांनी पोस्ट केली आहे. गोस्वामी यांच्या पोस्टवर अनेकांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मनोरंजनात्मक मालिकेत अभिनेता प्रसाद ओक, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, समीर चौधरी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. लेखक म्हणून सचिन गोस्वामी आणि अरविंद जगताप यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासोबत, इतरही लेखकाची टीम कार्यरत असून सृजन टीममध्ये विनोदी लेखक म्हणून विजय कुमार राख कार्यरत होते.

Video! पुण्यातील गावगुंडाकडून अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न…

अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!