पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोनाली गोविंद पवार (वय २५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूनंतर कोथरूड पोलिस ठाण्यात पती गोविंद पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि […]
अधिक वाचा...पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन; शेवटच्या नोटमध्ये लिहिलं…
पुणे : पुणे शहरात एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या युवकाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५, मुळ रा. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रथमेश […]
अधिक वाचा...डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये ‘जनआक्रोश आंदोलन’ ‘एसआयटी’ चौकशीची मागणी…
कराड: फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गेल्या २७ ऑगस्टला सायन येथे आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेले गावकरी व फलटण परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ‘जनआक्रोश आंदोलन’ केले. यावेळी पुणे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे […]
अधिक वाचा...तीन मुलांसह मातेची नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन मुलींची प्रकृती गंभीर…
धाराशिवः धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून एका मातेने आपल्या तीन निष्पाप चिमुकल्या मुलांसह थेट खाली उडी मारली. या दुर्देवी घटनेत आई आणि एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग […]
अधिक वाचा...ममता बॅनर्जींच्या भाचीची कुसुंबा गावातील घरात गळफास घेऊन आत्महत्या…
कोलकाताः रामपूरहाट भागातील कुसुंबा गावात आज दुपारी ब्रिस्ती मुखर्जी (वय २८) यांचा मृतदेह त्यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आढळून आला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तपास चालू आहे. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर चौकशीनंतर मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा उलगडा होईल, असे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुखर्जी गेल्या काही […]
अधिक वाचा...१४ वर्षांपूर्वी पोलिस गोळीबारात मुलगा मृत्यूमुखी पडलेल्या ठिकाणीच पित्याची आत्महत्या…
अहमदाबाद: गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील थांगड पोलीस गोळीबार घटनेत २०१२ मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी, ज्या परिसरात त्यांचा मुलगा पंकज सुमरा (वय १६) पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता, त्याच परिसरात अमरशीभाई सुमरा (वय ५३) यांनी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या एका हताश पित्याने त्याच परिसरात आपले जीवन […]
अधिक वाचा...आयटी इंजिनिअर प्रेयसीला भेटायला पुण्यात आला अन् नको ते घडलं…
पुणे: प्रियकरासोबत झालेल्या वादातून संगणक अभियंता असलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी पाठक (वय 23) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती मूळची बिहारची होती. […]
अधिक वाचा...जिद्दीने खाकी वर्दीचं केलं स्वप्न पूर्ण अन् महिला पोलिसाने घेतला गळफास…
पुणे : एका महिला पोलिसानं पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील करंजे येथील संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले यांचे सुपे हे सासर तर […]
अधिक वाचा...पोलिस उपनिरीक्षकाने खाकी वर्दीतच धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी…
हिंगोली : हिंगोली पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत जगाचा निरोप घेतला आहे. अमोल गंगलवाड (वय 50) असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. खाकी वर्दीमध्येच पोलिस अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हिंगोली पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे रुळावर आज (शनिवार) सकाळी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीकडून राखी बांधल्यानंतर भावाने संपवले जीवन; भावनिक मेसेज व्हायरल…
जळगाव : ‘सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो’ असा भावनिक मेसेज सोशल मीडियावर बहिणीला पाठवून भावाने गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. रोहित साहेबराव धनगर (वय १७) असे या मृत भावाचे नाव आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेने जळगावात मोठी […]
अधिक वाचा...
