धक्कादायक! शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, तिघांचे हात पाठीमागे…

नागपूर : नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तसेच प्रकरणातील वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप तरी या प्रकरणामागील कारण स्पष्ट झाले नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, तपासाअंतीच या प्रकरणामागील कारण कळू शकणार आहे.

विजय पचोरी हे सेवानिव्रुत्त शिक्षक आहेत. कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या व्यवसायातील नुकसानीमुळे वाद सुरु सुरू होते. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकल्या अवस्थेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणातील वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि हत्येनंतर स्वत: आत्महत्या तर केली नाही ना? अशीही शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. मात्र, घटनेची सत्यात पोलिस तपासतूनच पुढे येणार आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…

Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…

नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…

नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी पोलिस स्टेशनमध्ये डान्स करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!