नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…
नाशिक : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात हा अपघात झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी (रा.नाग्या-साक्या) असे अपघातातील मृत पती-पत्नीचे नाव आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…
नाशिक : नाशिक शहरातील कन्नमवार पुलावरुन पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असताना पतीने उड्डाण पुलावरून उडी घेत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलिस करत आहेत. पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीने धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज (शक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा…
नाशिक : मनमाड पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे यांचा नायलॉन मांजामुळे गळा कापला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनमाड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे येवला येथे बंदोबस्त करून मनमाडकडे येत असताना त्यांचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…
नाशिक: गुजरातहुन मोटारसायकलवर घरी येत असताना वाटेतच मांजाने गळा चिरल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली पाथर्डी परिसरात घडली आहे. सोनू किसन धोत्रे (वय २३) अस मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत सोनू धोत्रे याचे मे महिन्यात लग्न होणार होते. गुजरातवरून बहिणीला भेटण्यासाठी घरी जात असताना पाथर्डी येथे ही घटना घडली आहे. आपल्या बहिणीची भेट […]
अधिक वाचा...नाशिक शहरात घरामध्ये आढळला बाप-लेकाचा मृतदेह…
नाशिक : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात व्यावसायिक असलेल्या बापलेकाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. विषारी औषध सेवन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरातील काळाराम मंदिरालगत असलेल्या रामराज्य संकुलात राहणाऱ्या बापलेकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रशांत आत्माराम गुरव (वय ४९) आणि अभिषेक प्रशांत गुरव (वय २८) अशी मृत बापलेकांची […]
अधिक वाचा...नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली ‘भाईगिरी’…
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना पोलिस अंमलदार विशाल झगडे याने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण येथे ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…
नाशिकः मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शहा कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शहा दाम्पत्याने विष सेवन आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर […]
अधिक वाचा...नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…
नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, नाशिक पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पण, पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात […]
अधिक वाचा...
