नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ महिलेने पळवले…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची एका महिलेने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाचा शोध सुरू केला आहे. आरोपी महिला ही बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. सुमन अब्दुल खान या मूळच्या मध्यप्रदेशच्या असून सटाणा तालुक्यात राहतात. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 29 डिसेंबर रोजी त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर बाळ […]

अधिक वाचा...

नाशिक जिल्ह्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या अत्याचार…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. निफाड आणि आडगाव पोलिस ठाण्यात पीडितेने सात युवकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आडगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित युवती आणि संशयित यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित युवतीच्या […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा; सरकारकडे केली मागणी…

नाशिक: नाशिकमध्ये एक अनोखा मेळावा पार पडला. पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आले होते. पत्नीच्या जाचाला कंटाळलेले पुरुष एकत्र आले आणि त्यांनी आपली सुखदुख एकमेकांना सांगितली. एवढेच नव्हे तर आपल्या न्याय हक्कांसाठी सरकारकडे मागणी देखील केली आहे. पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते नाशिकच्या एका खासगी […]

अधिक वाचा...

आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी…

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळ यांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी दिली. […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…

नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि त्यातल्या त्यात पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील पंचवटी परिसरात सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावर गावगुंडांनी थेट हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी प्रकाश नेमाने सोमवारी (ता. ११) रात्री कर्तव्य संपल्यानंतर घरी जात असताना काही टवाळखोरांचा गट […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

नाशिक : नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात…

नाशिक : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि इच्छुकांना उमेदवारीची फेक ऑफर दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन तोतया अधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेश मिश्रा आणि गौरव नाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळवून देण्यासाठी 50 लाख […]

अधिक वाचा...

ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…

नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…

नाशिक : नाशिकमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री घडली आहे. पंचवटी पोलिस स्थानकात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. खडकी या ठिकाणी एका रस्त्यावर एक टोळके दहशत निर्माण करत होते. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…

नाशिक : नाशिक शहरातील सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका युवकाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोयता गँगने परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये अ‍ॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!