नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे आज (रविवार) सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक पाहण्यात ही घटना आत्महत्येची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतांमध्ये गोविंद […]
अधिक वाचा...नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीजवळील पेट्रोलपंपासमोर गुरुवारी (ता. २७) दुपारी आलेल्या विचित्र अपघातात कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. स्वाती संतोष बेल्हेकर (वय ४५, रा. त्र्यंबकेश्वर) असे मृत महिलेचे नाव होते. स्वाती बेल्हेकर या गुरुवारी दुपारी दुचाकीवरून (एमएच १५, केडी केडी ९३७२) त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे निघाल्या होत्या. पपया नर्सरी परिसरात दुचाकी घसरल्याने त्या रस्त्यावर पडल्या. […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो नवविवाहितेला दाखवले अन्…
नाशिक : नाशिकमध्ये नवविवाहित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा संतोष पवार (वय २७, रा. हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विवाहितेच्या सुसाईड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास दिला जात […]
अधिक वाचा...नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…
नाशिक : नाशिक पोलिस दलातील एकाचवेळी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी पोलिसांच्या बदल्या झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिस दलात फेरबदल केल्याची माहिती आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा निर्णय […]
अधिक वाचा...नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…
नाशिक : नाशिक शहरातील सातपूर परिसरात भरदिवसा एका युवकाचे अपहरण करण्याचा प्रकार घडला असून, युवकाने प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोबाईल फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. तेजस ज्ञानदेव घाडगे (वय 24, रा. त्र्यंबकराज नगर, ध्रुवनगर, नाशिक) याने […]
अधिक वाचा...धक्कादायक! चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने घेतला गळफास…
नाशिक : आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेतल्याची घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३४, रा. जेलरोड) या पोलिस […]
अधिक वाचा...गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गणेश अशोक कोंडे यांना लहानपणापासून श्वानाची आवड. वडील पोलिस दलातील श्वान पथकात कार्यरत होते. गणेशसुद्धा श्वानाच्या आवडीनेच पोलिस दलाकडे आकर्षित झाले आणि वयाच्या १८व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. गेल्या १६ वर्षांपासून ते पोलिस दलात असून, ११ वर्षांपासून श्वान पथकात कार्यरत आहेत. श्वानावर त्यांचे नितांत प्रेम. ‘गुगल’ या श्वानाला लहानपणापासून त्यांनी […]
अधिक वाचा...अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्विनी देवरे या पोलिस दलामध्ये गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना कझाकिस्तानमध्ये झालेल्या अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला आयर्नमॅन होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. शिवाय, सातासमुद्रापार तिरंगा मानाने फडकाविला आहे. लहानपणापासून अत्यंत खडतर प्रवासातून जिद्दीने त्या पुढे जात आहेत. […]
अधिक वाचा...वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) वैशाली केशवराव घरटे या लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार. शाळेमध्ये असताना दहावीत त्या प्रथम आल्या होत्या. शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. पण, डीएडला प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षिकेचे स्वप्न अपूर्ण राहिले. १२वी नंतर लग्न झाल्यानंतर पतीची साथ मिळाली आणि पोलिस दलात भरती झाल्या. शिवाय, पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. पोलिस दलात गेल्या १४ वर्षांपासून काम करत […]
अधिक वाचा...सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) नितीन धोंडगे हे गेल्या २४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील श्रावण धोंडगे हे पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. कुटुंबाचा पोलिस दलाचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला असून, पोलिस पाल्य म्हणून वयाच्या १८व्या वर्षी भरती झाले आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. पोलिस मोटार परिवहन विभागासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शिवाय, […]
अधिक वाचा...
