पुणे जिल्ह्यात युवकाची सपासप वार करून निर्घृण हत्या; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) या गावात एका युवकाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी तातडीने सूत्रे हालवत स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवक एका महिला आणि लहान मुलासह रस्त्याने चालत जात होता. त्याच वेळी मागून आलेल्या दुसऱ्या एका युवकाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच आरोपीने सोबत आणलेल्या धारदार चाकूने युवकावर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. हा हल्ला इतका प्राणघातक होता की, तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या महिला आणि लहान मुलाच्या डोळ्यांदेखत हा संपूर्ण प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्येनंतर पसार होणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांच्या मदतीने पाठलाग केला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

सारोळा गावातील महामार्गालगतच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही हत्येची संपूर्ण थरारक घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपी आणि मृत युवक यांच्यात काय वाद होता किंवा ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली का? याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मोठा खुलासा समोर…

पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!