पुणे शहरात वाहनचालकाला फिट आल्याने आठ वाहनांना धडक…

पुणे: पुणे शहरातील एम.जी. रोडजवळ सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

एक चारचाकी वाहन एमजी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होते. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या ७ ते ८ दुचाकी गाड्यांना धडक बसली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे रस्त्यावर चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळ वाहतूक थांबवावी लागली होती. शिवाय, अपघातात अन्य गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक चालक संतापले होते. शिवाय, नागरिकांनी देखील पाहण्यासाठी गर्दी केली आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!