जिद्दीला सलाम! महिला पोलिस अधिकाऱ्याचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी विक्रम…

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलामधील 50 वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याने जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

द्वारका विश्वनाथ डोखे (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील अधिकारी आहेत. त्यांचे मुळगाव असलेल्या श्रीरामपूर शहरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सध्या द्वारका डोखे या नाशिक येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असून काही वर्षांपूर्वी द्वारका यांच्या वाचनात “साद देती हिम शिखरे” हे पुस्तक आले आणि त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

द्वारका डोके यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प करताच, त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली. 2023 मध्ये त्यांनी नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील मैदान व जिमचा सराव सुरू केला. एव्हरेस्ट सर करताना ज्या-ज्या शारीरिक कसरती कराव्या लागणार, त्याची तयारी त्यांनी अकादमीत केली.

24 मार्च 2024 रोजी त्या काठमांडू येथे पोहोचल्या. एव्हरेस्ट शिखर सर करणारी कंपनीचे मालक लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोहीमेला सुरुवात केली. या मोहिमेत पासंग शेरपा हे द्वारका डोके यांच्यासमवेत शेवटपर्यंत सोबत होते. 17 मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथून चढाई सुरू केली. 22 मे रोजी पहाटेच्या 4 वाजून 10 मिनिटांनी ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज, महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज हातात घेत त्याठिकाणी राष्ट्रगीत म्हटले. तसेच, जो संकल्प त्यांनी केला, त्यानुसार आई-वडिलांचा फोटो हातात घेऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या आहेत. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्या २३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचल्या. तर, त्यांच्या गावी सोमवारी (ता. २७) सकाळी सात वाजता पोहोचताच त्यांचे जंगी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!

गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!

शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!