
महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा; 300 व्हिडिओ…
हैद्राबाद (आंध्र प्रदेश): एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या शौचालयात एक कॅमेरा लपवण्यात आला होता. या कॅमेऱ्याने युवतींचे ३०० आक्षेपार्ह व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील गुडलावलेरु कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुलींच्या वसतीगृहातील एका शौचालयात हा छुपा कॅमेरा लावण्यात आला होता. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुडलावलेरु महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस सध्या या सगळ्यांची कसून चौकशी करत आहेत. छुप्या कॅमेऱ्याने टिपण्यात आलेले हे व्हिडिओ शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या या युवकांकडून इंटरनेटवर विकले जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलींच्या वसतीगृहातील एका शौचालयात गुरुवारी (ता. 29) हा छुपा कॅमेरा विद्यार्थ्यांना सापडला. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून त्यामधील डेटा तपासून पाहिला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आम्हाला मुलींच्या हॉस्टेलमध्ये कोणताही छुपा कॅमेरा मिळाला नाही. आम्ही संशयित विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली. आतापर्यंत त्यांच्याकडे कोणताही व्हिडिओ सापडलेल नाही. महाविद्यालयातील युवतींना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, हॉस्टेलमध्ये सापडलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने 300 पेक्षा अधिक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. संबंधित व्हिडिओ मुलांच्या वसतीगृहात दाखवण्यात आले. या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरुन शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्याच्याकडून अद्याप मुलींचा आक्षेपार्ह अवस्थेतील कोणताही व्हिडिओ मिळालेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्री दिसली अन्…
Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…
अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
सावधान! Tinder गर्लचा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी बील किती पाहा…
शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

