सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या; धक्कादायक कारण समोर…

मुंबई: पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने एका व्यक्तीने चक्क 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. चिमुकली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून आरोपी इमरान शेख याला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

चिमुकली रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. परिणामी इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्याने गळा आवळून हत्या केली. यानंतर मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. चिमुकली बेपत्ता झाल्यापासून इमरान शेख बेपत्ता झाल्याने हा संशय अधिक बळावला. अखेर पोलिस तपासात सत्य बाहेर आलं आणि अँटॉप हिल पोलिसांनी वरळीवरून इमरान शेख याला अटक करत बेड्या ठोकल्या आहे.

दरम्यान, चिमुकलीची हत्या झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

येमेनमध्ये कैद असलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिची फाशी टळली…

पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली ‘जिवंत’…

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!