प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….

प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
पोलिस दलातही डॅशिंग अधिकारी म्हणून बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप विठोबा मानकर यांची ओळख आहे. त्यांना लहानपणापासून कुस्तीची आवड. शारीरिक व्यायामाबरोबरच वैचारीक खुराकही तितकाच महत्त्वाचा असतो. शारीरिक आणि वैचारीक खुराकाची सांगड घालण्याचे काम श्री. मानकर यांनी केले आहे. पोलिस दलात गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलाने त्यांच्या कामाची दखल घेऊन १ मे २०२१ रोजी पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह दिले आहे. कुस्ती क्षेत्रातून पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असलेले डॅशिंग परंतु तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख. श्री. मानकर यांची पोलिस दलातील प्रेरणादायी कहाणी…

श्री. प्रताप मानकर यांना व्यायामाची प्रचंड आवड. कुस्ती हा तर त्यांचा आवडीचा छंद. कुस्तीचा वारसा आला तो वडील विठोबा मानकर यांच्याकडून. शरीर फिट असल्यामुळे पोलिस दलात काम करत असताना आरोपींना पकडण्यासाठी अनेकदा त्यांना फायदा झाला आहे. श्री. मानकर यांचा वयाच्या ५५व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस पाहायला मिळतो. व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांनी घरातच व्यायामशाळा उघडली आहे. सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास उठल्यानंतर प्राणायाम, सूर्यनमस्काराने त्यांचा दिवस सुरू होतो. १९९७ पासून ते आजपर्यंत न चुकता सूर्यनमस्कार घालत आहेत.

व्यायाम हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. कुस्तीबरोबरच सायकलिंग आणि चालणे हे त्यांच्या फिटनेसमागील गुपित. व्यसन तर नाहीच पण वाचन आणि कविता करण्याची आवड असल्यामुळे ताणतणाव जाणवत नाही. आपली भगवदगीता आपणच तयार करायची, हे पहिल्यापासूनच त्यांनी ठरवलेले. पोलिस दलात काम करत असताना जेवढे काही चांगले करता येईल तेवढे करत राहायचे. आरोपींना सोडायचे नाही. पण, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम श्री. मानकर करत आले आहेत…

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…

‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!