हृदयद्रावक! मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आईनेही मारली उडी…

छत्रपती संभाजीनगर: मुलाला वाचवताना आई-वडिलांनादेखील आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई-सातारा परिसरातील रहिवासी असलेला कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८) हा युवक सकाळी १० वाजेच्या सुमारास खवड्या डोंगरावर गेला होता. कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना ही गोष्ट समजताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. दरीच्या टोकावर उभा राहून कुणाल आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे, स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासनाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने डोंगरावर पोहोचले. सर् वजण सलग काही तास कुणाल याला उडी न मारण्याची गयावया करत असतानाच समजावून सांगत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर संयम सुटल्याने वडील मुरलीधर यांनी धाडस दाखवून पुढे जात मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच क्षणी कुणालने स्वतःला दरीत झोकून दिले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि दोघेही अत्यंत उंचावरून थेट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

मुलगा आणि पती डोळ्यांसमोर दरीत कोसळल्याचे पाहून आई संगीता चांदवडे यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनीही त्याच डोंगरावरून खाली दरीत उडी घेतली. या घटनेत आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुणालने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…

हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…

हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…

हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…

हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!