
फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर केला अत्याचार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा भागातील एका महिलेला सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
जुझर बद्री जसदेनवाला (रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या चार वर्षापासून आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका महिलेच्या तो संपर्कात आला. ऑक्टोबर 2021 पासून फोनवर बोलणे, मेसेज करणे अशा प्रकारच्या गोष्टी आरोपी सातत्याने करत होता, याकडे पीडित महिला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती. ‘तू मला भेटण्यासाठी माझ्या घरी ये नाहीतर मी तुझे अशील फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया, नातेवाईक, सर्वांकडे देईल,’ अशा प्रकारच्या धमक्या सदरील महिलेला फोनवर देऊन पीडित महिलेला घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. जर तू ही घटना कोणाला सांगितली तर पाठीमागील सर्व व्हिडिओ फोटो व आजचे सुद्धा फोटो व्हिडिओ मी सर्व समाजात प्रसारित करीन व तुझ्या आयुष्याची वाट लावील,’ अशा प्रकारच्या धमक्या देऊन सदर पीडित महिलेवर आरोपीने स्वतःच्या राहत्या घरी अतिप्रसंग केला.
पीडित महिलेने घडलेली घटना आपल्या पतीला व नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार पीडित महिलेने कोंढवा पोलिस स्टेशन येथे रितसर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार कलम 74, कलम 64 (2) (m) 351(1) गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत.
पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…
माता न तू वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं…
पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
विद्येच्या माहेर घरात युवकासोबत तिघांनी केला विकृतीचा कळस…
पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…

