युट्युबवरील व्हिडिओ पाहून घरातच छापल्या बनावट नोटा अन्…

मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (वय २६, रा. नवी मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने युट्युबवरील व्हिडिओ पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. आरोपी प्रफुल्ल पाटील याच्या घरामध्ये 2 लाख 3 हजार 200 रुपयांच्या 50, 100 आणि 200 रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा जफ्त केल्या आहेत.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

प्रफुल्ल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून एकटाच वेगळा राहतो. आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली होती. याद्वारे त्याने 10, 20, 50, 100 व 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याने आत्तापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या, तसेच या नोटा बाजारात कुठे-कुठे वापरल्या याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून तळोजा एमआयडीसी परिसरातून प्रफुल्ल गोविंद पाटील यास ताब्यात घेतले. या झडतीमध्ये त्याच्याकडे काही बनावट नोटा आढळल्या असून त्याच्या घराची पाहणी केल्यावर त्याने सुरू केलेला बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला आहे. तसेच, प्रफुल्लने छापलेल्या 2 लाख रुपये किंमतीच्या 1,443 बनावट नोटादेखील सापडल्या. त्यामध्ये पन्नासच्या 574, शंभरच्या 33 आणि दोनशेच्या 856 बनावट नोटांचा समावेश आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य फरार आरोपी भिंडे याला अटक…

सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…

महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!