पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिस आयुक्तपदाचा रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १) पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मॅचफिक्सिंगचा भांडाफोड करणारे आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलिस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला आहे. अमितेश कुमार हे भारतीय सेवा पोलिस 1995 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. अमितेश कुमार हे 2020 ते 2023 या कालावधीत नागपूरचे पोलिस आयुक्त होते. त्यांनी मॅच फिक्सिंगचा प्रकार उघडकीस आणला होता. यात दाऊद इब्राहिम टोळीतील काही सराईत सामील झाल्याचे लक्षात आल्यानंतर क्रिकेटच्या दुनियेत चांगलीच खळबळ उडाली होती. नागपूरमधील गुन्हेगारी थांबविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारतानाच थेट हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात हेल्मेट सक्ती होण्याची शक्यता आहे. पदभार स्विकारल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे शहरातील वाहतूक, महिला सुरक्षितता आणि पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता, सायबर क्राईमवर अधिक लक्ष देणार असल्याचे सांगितले.

कोण आहेत अमितेश कुमार…
नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलिस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतलेले अमितेश कुमार कायदा आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमितेश कुमार हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अमितेश कुमार हे नागपूर आणि मुंबईचे पोलिस उपायुक्त, सोलापूर आणि औरंगाबाद (ग्रामीण) पोलिस अधीक्षक, अमरावतीचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त (एटीएस), आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र) म्हणून काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा देण्यात आले आहे. बिहारमधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केली आहे.

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी…

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!