अजब कारभार! शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर गैरसमजुतीने गुन्हे…

पुणे : पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी मुंढवा येथील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी जमीन घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना बोपोडी जमीन घोटाळ्यात क्लिन चीट दिली आहे. गैरसमजुतीतून बोपोडी प्रकरणात त्यांची नावे गुन्ह्यात नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

बोपोडीतील जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. गैरसमजुतीतून त्यांची नावे गुन्ह्यात नोंद करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांकडून जरी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. मात्र, मुंढवा इथल्या जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानी आणि दिग्वीजय पाटील यांची चौकशी करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

मुंढवा येथील जमीन व्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलिस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु या़ंच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता‌. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा बोपोडी आणि मुंढवा या दोन जमीन घोटाळ्यांची संबंधित असल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र, आता या यातील फक्त मुंढव्याच्या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी होईल, असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. पुणे पोलिस आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे, गुन्हा दाखल करणारे पोलिसच आता गैरसमजुतीचे कारण पुढे करत असल्याने पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात गेली पळून? पुणे पोलिसांकडून शोध सुरु…

जमीन गैरव्यवहार प्रकरण! शीतल तेजवाणीचे आणखी एक कांड समोर…

पुणे! मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारवर…

Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…

पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!