
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला आहे. नाशिक शहरामधील गुन्हेगारी कमी होऊ लागल्यामुळे नाशिककर पोलिस आयुक्तांचे आभार मानत आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा आढावा घेतला आणि कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहर सुरक्षित कसे करता येईल, याकडे ते लक्ष देत आहेत. रस्त्यांवर बसलेल्या टवाळखोरांपासून ते ठिकठिकाणचे बॅनर काढून टाकल्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलताना दिसत आहे.
नाशिक पोलिसांनी गुरुवारी सायकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणे कडील तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिट यांनी अंमली पदार्थाचे विक्री/सेवन करणारे रेकॉर्डवरील सराईतांचा शोध घेण्यासाठी तसेच टवाळखोरावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करून सर्व पोलिस ठाणे हददीत विशेष मोहिम राबविली.
सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हददीत पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका व गुन्हेशाखा युनिट -१, खंडणी विरोधी व गुंडा विरोधी पथक यांनी सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या २०६ जणांविरूध्द व परिमंडळ-२ हददीतील सातपर, अंबड, चुंचाळे चौकी, इंदीरानगर, उपनगर, नाशिकरोड, दे. कॅम्प, गुन्हेशखा युनिट -२, दरोडाशस्त्र विरोधी व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी २३६ इसमांविरूध्द अशा एकुण ४४२ इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी राबविलेल्या नाकाबंदी दरम्यान एकुण ३२ वाहनांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघणार्थ १६ हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे वेळोवेळी विशेष मोहिमा राबवुन कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई दरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये गुन्हेशाखेकडील तसेच पोलिस ठाणेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन कारवाई केली आहे.
संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
Video: नाशिकमध्ये गुंडाचा झेरॉक्स दुकानावर तलवारीने हल्ला; युवती जागेवर बेशुद्ध…
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

