जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांचा आदेश उच्च न्यायालयाने फेटाळला…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये २२ ऑगस्ट २०२४ रोजी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे (Writ Petition NO. ५०४८/२०२४) व आशिष सुरेशबाबू लोणकर (Writ Petition NO. ५०५२/२०२४) या दोन संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ आदेशाविरुद्ध आवाहन याचीका दाखल केली होती. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी सदरचा आदेश रद्द करुन सोमवारी (दि. ७/४/२०२५) खारीज केला आहे. तसेच दोन्हीही संचालकांना मुळ कार्यालयात (Apmc, Ghatanji) संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांची बाजू उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर व ॲड. यशोवर्धन सांबरे यांनी मांडली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी येथे संचालक अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर व इतर शेतक-यांनी दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी कापसाचा सुरू असलेला लिलाव बंद पाडुन रास्तारोको करण्यात आल्याचा आरोप करुन कृषी उत्पन्न बाजार समितीने २७ जानेवारी २०२४ च्या झालेल्या मासिक सभेस सभापती भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी व इतर संचालकांनी ठराव क्रमांक ६ प्रमाणे गैरअर्जदार अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर यांना पदावरुन दुर करण्याबाबतचा ठराव १० विरुद्ध ६ मतांनी (संचालक) पारित केला. सदर आदेशाला विचलीत होऊन संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आवाहन याचीका दाखल केली. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी आपल्या आदेशात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ व कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी यांचेवर चुकीची कारवाई केल्याचा ठपका ठेवून ताशेरे ओढले आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांच्या दोन्ही याचिका मंजूर केल्या असून याचिकाकर्त्यांना मुळ कार्यालयात (Apmc, Ghatanji) संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर ह्यांची बाजु वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर व ॲड. यशोवर्धन सांबरे यांनी मांडली.

धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…

बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!