Video: कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला अनोखा पद्धतीने निरोप…
जयपूर (राजस्थान) : एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला चक्क घोड्यावर बसवून, फुलांचे हार घालून निरोप देण्यात आला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डूंगरपुर जिल्ह्यातील ओबरी ठाण्याचे प्रभारी देंवेंद्र सिंह राव यांची उदयपूर जिल्ह्यात बदली झाल्यामुळे त्यांना घोड्यावर बसवून निरोप देण्यात आला. त्यांच्या गळ्यात फुलहार घालून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी चांगल्या पद्धतीने आमची कामे करुन आमचे मन जिंकले, असे नागरिकांनी सांगितले. तर जेव्हा तुम्ही लोक कोणत्या कामाने मला बोलवाल तर मी नक्की येईल, असे देवेंद्र सिंह राव यांनी स्थानिकांना आश्वासन दिले. देवेंद्र सिंह राव यांनी ओबरी पोलिस ठाण्यात 9 महिने सेवा दिली. त्यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर स्थानिकांनी एकत्र येत त्यांना घोड्यावर बसवून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली.
स्थानिक हिरालाल पटेल म्हणाले, ‘पोलिस अधिकारी देवेंद्र सिंह राव हे 9 महिने ओबरी ठाण्यात होते. या दरम्यान त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले. नागरिकांसोबत त्यांचे वागणे खूप चांगले होते. तसेच त्यांच्या कार्यकाळात परिसरात कोणतीच मोठी अनुचित घटना घडली नाही. कोणत्याही घटनेची माहिती मिळताच ते लगेच घटनास्थळी हजर व्हायचे. नागरिकांची मने त्यांनी जिंकली होती.त्यामुळे त्यांना घोड्यावर बसवून वाजत गाजत निरोप देण्यात आला.’