हृदयद्रावक! कुटुंबातील सात जणांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप; कारण…

चंडीगड (हरियाणा): कर्जबाजारीपणाला कंटाळून पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांना सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये चार व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करुन या सगळ्यांना विषप्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथील सकेत्रीनजीक भाड्याच्या घरात वास्तव्याला होते. प्रवीण मित्तल हे भंगाराचा व्यवसाय करायचे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या प्रवीण मित्तल यांनी कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना गाडीतून सापडलेल्या दोन पानी चिठ्ठीतून सगळा तपशील समोर आला आहे.

प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली. प्रवीण मित्तल यांनी चिठ्ठीत म्हटले होते की, हा सगळा माझा दोष आहे. यासाठी माझ्या सासू-सासऱ्यांना त्रास देऊ नये.

मित्तल कुटुंबावर 20 कोटी रुपयांचे कर्ज होते. बँकेने त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. प्रवीण मित्तल हे एक मोठे भंगार व्यावसायिक होते. एकेकाळी मित्तल कुटुंबाने स्वत:चा कारखाना, गाडी, फ्लॅट अशाप्रकारचे ऐषोरामी जीवन जगले होते. हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे मित्तल यांचा भंगाराचा कारखाना होता. मात्र, कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. त्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी देणेकऱ्यांचा तगादा लागल्याने मित्तल कुटुंबीय हे पंचकूला येथील सकेत्री गावात राहायला गेले होते. त्यांच्यावर जवळपास 20 कोटी रुपयांचे कर्ज होते. प्रवीण मित्तल हे उदरनिर्वाहासाठी कॅब चालवू लागले होते.

Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…

हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…

हृदयद्रावक Video: महिलेला कारने उडवले; आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड…

हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…

हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!