
पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी…
पुणे : पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. युवतीने पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इंस्टाग्रामवरु दोघांची ओळख झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीसोबत ओळख वाढविली. त्यानंतर चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर युवतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची तशीच शारीरिक सुखाची मागणी करू लागला होता. यानंतर युवतीने पोलिसांकडे धाव घेतली.
एका 24 वर्षाच्या युवतीची इंस्टाग्रामवरुन शुभम राठोड याच्यासोबत ओळख झाली होती. शुभम याने ‘पीएसआय शुभम राठोड’ या नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरून त्यावरून व्हाटसअप तसेच कॉल करून युवतीशी संपर्क साधला. त्यानंतर तिच्याशी ओखळ वाढवली. त्यानंतर नंबर मागवून तिच्याशई whatsappवर बोलणे सुरु केले होते. पीएसआय असल्याचे सांगून लग्न करायचे आहे, असे सांगून तिचे फोटो प्राप्त केले. ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली. आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करुन तिच्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, शुभम याने वारंवार फोनवरून, व्हाटसअपवरून लग्नाची, शारीरिक सुखाची व पैशांची मागणी करू लागला. यामुळे त्रासलेल्या युवतीने थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी…
पोलिस अधिकाऱ्याने पीडित महिलेकडे केली शरिरसुखाची मागणी…
हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…
प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…
प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…

