पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…

पुणे : गँगस्टर निलेश घायवळ सध्या लंडनला पळून गेला असून, पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने घायवळ टोळीतील २ जणांना अटक केली आहे. अटकेत आलेल्या या दोन्ही गुन्हेगारांचा घायवळशी काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलिस करत आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे इथून घायवळ गँगमधील दोघांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गांजा विक्री करताना या दोघांना अटक केली. मुसाब इलाही शेख (वय 55, राहणार कोथरूड, पुणे) तर दुसरा आरोपी तेजस पूनमचंद डांगी (वय 33, नऱ्हे) असे अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींवर अगोदरच वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत.

मुसाफ इलाई शेख हा बेकायदेशीररित्या गांजा स्वतः जवळ बाळगून तो विकत होता. त्याच्या ताब्यातून 878 ग्राम गांजा ज्याची किंमत बारा हजार दोनशे साठ रुपये एवढी आहे. यातील मुसाफ इलाई शेख याच्यावर कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल तर तेजस डांगी याच्यावर दोन गुन्हे हिंजवडी पोलिस स्टेशनला दाखल आहेत. सध्या निलेश घायवळ परदेशात आहे, त्यामुळे या दोघांचे त्याच्याशी काही कनेक्शन आहे का याचा तपास पुणे पोलिस करत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

दोन्ही आरोपींना नऱ्हे इथून अटक केली आहे. 10 ऑक्टोबर आमच्याकडे गुन्हा आला आहे, विविध टीम बनवून आरोपी शोध घेतला जात आहे अजून ही अटक केल्या जातील. निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. सचिन घायवळ यालाही अटक करण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यात येत आहे. अंधेकर टोळीवर प्लॉट बळकावणे बाबत उत्तमनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होईल, असेही पंकज देशमुख यांनी सांगितले.

गुंड निलेश घायवाळ याला पुन्हा दणका; सहावा गुन्हा कोणता पाहा…

निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…

गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…

गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!