पुणे रेल्वे स्थानकावर मिझोरममधील महिलेकडून साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त…

पुणेः दिल्लीहून पुण्याला आलेल्या मिझोरम राज्यातील एका महिलेकडून तब्बल तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) पुणे रेल्वे स्थानकात ही कारवाई करण्यात आली. यामुळे अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्य जाळे उघडकीस येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लालरे मलियानी (वय ३२, रा. ऐझॉल, मिझोरम) असे या महिलेचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून निघालेल्या स्वर्णजयंती एक्सप्रेसमधून मलियानी प्रवास करत होती. तिच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी पहाटे पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन परिसरात सापळा लावण्यात आला. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मलियानी हिच्याकडील पिशवी, तसेच साहित्याची तपासणी करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

तिच्याकडील पिशवीत दोन हजार ५३२ ग्रॅम स्फटिकासारख्या दिसणाऱ्या गोळ्या सापडल्या, तसेच विविध रंगांच्या गोळ्या सापडल्या. अमली पदार्थ तपासणी उपकरणाकडून (नार्कोटिक्स डिटेक्टशन किट) तपासणी करण्यात आली. तपासणीत तिने अमली पदार्थ बाळगल्याचे उघडकीस आले. तिच्याकडून ॲम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ, एमडीएमए अशा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत तीन कोटी ४१ लाख रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अशिमा नावाच्या एका आफ्रिकन व्यक्तीने हे अमली पदार्थ दिले होते. रेल्वे तिकिटाची व्यवस्थाही त्यानेच केली होती. म्हैसूरला पोहचल्यानंतर अमली पदार्थांची पिशवी एका व्यक्तीला देण्याची सूचना अशिमाने महिलेला दिली होती, असे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेला विशेष न्यायालयाने ‘डीआरआय’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्…

पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…

पुणे! जुन्नरच्या पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं; घराबाहेर बोलावलं अन्…

पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…

पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!