
महाराष्ट्रात चाललंय काय? युवकासमोरच होणाऱ्या पत्नीवर अत्याचार…
जालना : जालना रेल्वे स्थानक परिसरात एकाने युवकाला धमकी देत त्याच्या होणाऱ्या पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २५) रात्री नऊच्या दरम्यान घडली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना घडत असून, नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
जालना रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री होणारा पती थांबला होता. त्याची होणारी पत्नी डबा देण्यासाठी तिथे आली होती. रात्री नऊच्या सुमारास दोघंही पायी चालत घरी परत चालले होते. दरम्यान, युवतीच्या ओळखीचा प्रेम रवी पाचगे त्याठिकाणी आला. त्याने जोडप्याला अडवलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, असे म्हणत युवतीचा हात धरून तिला अंधारात घेऊन गेला. तसेच जागेवरून हलला तर जीवे मारेन, अशी धमकी आरोपीने होणाऱ्या पतीला दिली.
आरोपीने पीडित युवतीला भुयारी पुलाजवळ असलेल्या नाल्यात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर दोघांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्र फिरवली.
कदीम जालना पोलिसांनी अवघ्या ४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पीडित युवतीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला २९ डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
महाराष्ट्रातील पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, जाळण्याचा प्रयत्न…
धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…
धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं…
महाराष्ट्रातील पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, जाळण्याचा प्रयत्न…
सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

