नांदेडमध्ये पाठलाग करताना आरोपींनी केला पोलिसांवरच गोळीबार…

नांदेड : नांदेड शहरातील अष्टविनायक नगर भागात रवींद्र जोशी यांच्यावर गोळीबार करून अज्ञात आरोपींनी 40 हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवत 3 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. एका आरोपीला नांदेड शहरातून अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

गोळीबार करुन पैसे लुटणारे दोघे शहराजवळच्या असर्जन भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांची पथकं त्या ठिकाणी पोहचली. पोलिसांना पाहून दोन्ही आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर एका आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रतिउत्तरात गोळीबार केला. एक गोळी एका आरोपीच्या पायाला लागली. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. हरदीप सिंघ धिल्लोन हा आरोपी नांदेड शहरातील रहिवाशी असून रोहीत कौडा आणि सरप्रीत सिंघ सतोहा हे दोघे पंजाब राज्यातील रहिवाशी आहेत. आरोपीकडून लुटलेले चाळीस हजार रूपये, एक पिस्टल, दोन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जखमी आरोपीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी रवींद्र जोशी यांच्याकडे असलेल्या पैशांची पिशवी खेचली. पैसे लुटताना रवींद्र जोशी यांनी प्रतिकार केला, यावेळी त्यांच्यात आणि आरोपींमध्ये झटापट झाली. यात रवींद्र जोशी यांच्या हाताला एक आणि पायाला एक गोळी लागली. जोशींकडे असलेले 40 हजार रुपये घेऊन आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या रवींद्र जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…

पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!