संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…

मुंबई: एका शुद्ध शाकाहारी असललेल्या व्यक्तीने रेस्टॉरंटमधून जेवनाची ऑर्डर मागवली होती. पण, ऑर्डरमध्ये चक्के मेलेला उंदीर निघाल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे.

मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीने शुद्ध शाकाहारी जेवन ऑर्डर मागवले होते. मात्र त्याच्या खाण्यात मेलेला उंदीर आढळून आला. यामुळे राजीवला अन्नातून विषबाधा झाली आणि 75 तास हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. संबंधित घटना 8 जानेवारीला घडली होती. या घटनेनंतर राजीवने पोलिस स्टेशनमध्ये याविषयी तक्रार दाखल केली आहे.

राजीवने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेली घटना सांगितली. याशिवाय त्याने फोटोही शेअर केले आहेत. राजीवची पोस्ट व्हायरल होताच या हॉटेलने एक पत्रक जारी केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही याविषयी चौकशी केल्यावर कोणताही दोष आढळून आला नाही. कर्मचाऱ्यांनाही याविषयी विचारल्यावर मात्र यातून कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे आम्ही याप्रकरणातील चौकशीसाठी तयार आहोत.’

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

मुंबईत सुटकेसमध्ये आढळला युवतीच्या मृतदेह; पोलिसांकडून छडा…

मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…

मुंबईत पॉर्न फिल्मचे शूटिंग सुरु असताना पोलिसांनी टाकली धाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!