
तृतीयपंथी बनून आला अन् एअर हॉस्ट्रेसला संमोहित करत केला अत्याचार…
मुंबई: एका एअर होस्टेसवर एका व्यक्तीने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात घडली आहे. स्वतःला ट्रान्सजेंडर भासवून तिच्या फ्लॅटमध्ये घुसला अन् हिप्नोटाईज करून तिच्यावर बलात्कार केला आहे. अनिल शिंदे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी तातडीने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचा आधार घेत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एअर होस्टेसच्या (वय २५) आजारी पतीला बरे करण्यासाठी काळी जादू करण्याच्या बहाण्याने, स्वतःला ट्रान्सजेंडर भासवून तिच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्यावर पाणी शिंपडलं होतं. तिच्या डोक्यावर हात ठेवला अन् तिला संमोहित अवस्थेत बेडरूममध्ये नेले आणि डोळे मिटून पलंगावर झोपायला सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा तिला थोडीशी कुनकुन लागली तेव्हा ती ओरडली. तेव्हा आरोपीने 200 रुपये घेऊन पळ काढला.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल शिंदे याला एफआयआर दाखल झाल्यानंतर चार तासांच्या आत, बुधवारी पहाटे कळवा येथील झोपडपट्टीतून अटक केली आहे. पवई इमारतीपासून कळवापर्यंतच्या मार्गावरील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे त्याच्या हालचालींचा माग काढण्यात आला. त्यानंतर आता आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोल्हापूर! सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि गायिकेचा मोबाईल नंबर मिळवल्यावर…
पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…
नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…
PSI चा विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार; माझे तिच्यावर प्रेम…
पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

