धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्वीट करत दिली माहिती…

मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्विट करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

हेमा मालिनी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,”जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार माध्यमांनी जी व्यक्ती उपचार घेत आहे, ज्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशा व्यक्तीबद्दल खोटी बातमी पसरवणे हे कितपत योग्य आहे? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि गैरजबाबदार वर्तन आहे. कृपया त्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आणि त्यांच्या भावना यांचा आदर करा”.

हेमा मालिनी यांनी याआधीदेखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, ‘धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत”. तर दुसरीकडे रात्री उशीरा सनी देओलच्या टीमने माहिती दिली होती की,”धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. पुढील अपडेट्स मिळताच आम्ही शेअर करू. सर्वांना विनंती आहे की, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा”.

दरम्यान, धर्मेंद्र यांचा 8 डिसेंबर 2025 रोजी 90 वा वाढदिवस आहे. याआधी, यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांच्यावर डोळ्यांवर ग्राफ्ट ऑपरेशन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी सन 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर विविध चित्रपटांमध्ये उठावदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.

दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…

पिंजरा! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन…

Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!