
रत्नागिरीत खोल समुद्रात खलाशाने छाटलं तांडेलचं शीर…
रत्नागिरी : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाने नौकेवरील तांडेलची हत्या करून त्याचे डोकं छाटलं आणि हे डोकं बोटीवर ठेवून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कुणकेश्वर समुद्रामध्ये घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) याला पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरी येथील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारीसाठी निघाली होती. कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी आणि तांडेल यांच्यात वाद विकोपाला गेला. खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा याने तांडेल रवींद्र नाटेकर (रा. गुहागर) याचा खून करून नौका पेटवून दिली.
नौकेने पेट घेतल्याचे नजीकच्या नौकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नौकेवरील खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासनाला दिली. त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस दलास माहिती दिली. सागर पोलीस दलाच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले. यावेळी देवगड बंदरातून म्हाळसा मल्हार या नौकेने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. शिवाय, खलाशांना देवगड बंदरात मिनाक्षी नौकेवरून आणण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
दुबईवरून भारतात येताना प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं लाखो रुपयांचं सोनं; पण…
हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात…

