
फिलीपिन्समधील शाळेत झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू; आठ जण जखमी…
मनिलाः दक्षिण फिलीपिन्समधील एका माध्यमिक विद्यालयात झालेल्या गोळीबारात, हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जून महिन्यापासून देशाच्या दक्षिण भागात घडलेली गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी फिलीपिन्सच्या शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना क्वचितच घडत असत.
दक्षिण कोटाबाटोमधील बंगा शहराचे महापौर, अल्बर्ट पॅलेन्सिया यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, की या घटनेत आठ जण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पालेन्सिया म्हणाले, की हल्लेखोर त्याच्या मित्रांसोबत बसला होता आणि त्याने त्यांना घरी जाण्यास सांगितले. हल्लेखोराने त्याच्या मित्रांना सांगितले, मी जेवणानंतर माझी योजना अमलात आणणार आहे. हे ऐकून त्याचे मित्र हसू लागले, कारण तो हल्लेखोर बराच विनोदी होता. घटनेचा तपशील देताना पालेन्सिया पुढे म्हणाले, की जेवणानंतर, हल्लेखोराने विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि स्वतःला ठार करण्यापूर्वी १० विद्यार्थ्यांना गोळ्या घातल्या.
फिलीपिन्समध्ये यापूर्वी शाळांमधील गोळीबाराच्या घटना दुर्मिळ होत्या. पण जूनपासून घडलेली ही तिसरी प्राणघातक घटना आहे. गेल्या महिन्यात, देशाच्या दक्षिणेकडील झांबोआंगामध्ये एका विद्यार्थ्याने वर्गात दुसऱ्या विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार मारल्याचा व्हीडिओ थेट प्रक्षेपित केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली.
जून महिन्याच्या सुरुवातीला, टाक्लोबानमधील एका सार्वजनिक महाविद्यालयावर झालेल्या हल्ल्यात किमान तीन विद्यार्थी ठार, तर सुमारे २० जण जखमी झाले होते. दोन वर्गमित्रांनी
शुक्रवारच्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी, ऑगस्ट महिन्यात थायलंडमध्ये एक मोठी घटना घडली होती, ज्यात राजधानी बँकॉकच्या बाहेरील एका शाळेत एका विद्यार्थ्याने गोळीबार केला होता.
फिलीपिन्समध्ये बंदूक बाळगण्यासंबंधी कडक नियम आहेत. त्यात पार्श्वभूमी तपासणी आणि मानसिक तपासणीच्या आवश्यकतांचा समावेश असतो. तरीही बेकायदा शस्त्रे वापरात आहेत. दक्षिण कोटाबाटोचे गव्हर्नर रेनाल्डो तामायो यांनी पालकांना आवाहन करताना, प्राणघातक शस्त्रे अल्पवयीन मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवल्याची खात्री करावी.
बंदूक बाळगण्याच्या बाबतीत आपण जबाबदार असायला हवे. विशेषतः बंदूक मालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे, की अल्पवयीन मुलांच्या हाती ती लागणार नाहीत, असे तामायो म्हणाले. त्यांनी फिलिपिनो लोकांना आवाहन केले, की काही सुरक्षा रक्षकांनी हजारो विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे, अन्यथा या समस्येचा सामना करणे कठीण होईल.

