धक्कादायक! पुणे जिल्ह्यात युवतीला गाडण्यासाठी जेसीबीने अंगावर टाकली माती अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यात एका युवतीला जमिनीत जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातील ही घटना असून, युवतीला जमिनीत गाडले. 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या मदतीने तिच्यावर माती टाकली. संबंधित घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जमिनीच्या वादातून युवतीला (वय २२) जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमिनीत गाडलेल्या या युवतीने सुटका झाल्यानंतर स्वतःच पोलिसात तक्रार दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात युवती कंबरेपर्यंत मातीत गाडलेली असल्याचे दिसत आहे.

युवतीने घडलेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये रितसर लेखी तक्रार दिली आहे. राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 307 प्रमाणे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल अशी त्यांची नावे आहेत. या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!