चिमुकलीने काढले चित्र आणि हत्याकांडाचा झाला उलगडा…

लखनौ (उत्तर प्रदेश): आईला गळा दाबून मारल्यानंतर तिला पंख्याला लटकावल्याचे चित्र चार वर्षांच्या चिमुकलीने काढले आणि आरोपीचे नाव समजताच अनेकांना धक्काच बसला. चार वर्षांच्या मुलीने आपले वडीलच आईची हत्या करत असल्याचे स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. पण, घाबरल्यामुळे तेव्हा ती काहीही बोलली नाही. यानंतर पोलीस घरी आले. मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीने स्वत:हून जीवन संपवल्याचा जबाब पोलिसांना दिला, पण या चार वर्षांच्या मुलीने एक चित्र काढलं, ज्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.

चिमुकलीने आईचे दोन्ही हात बरोबर काढले आहेत, पण आईच्या गळ्याच्या उजवीकडे मुलीने आणखी एक हात काढला आहे. चित्रामधला हा तिसरा हात आहे, पण यात फक्त हातच दिसत आहे, मुलीने कोणाचाही चेहरा काढलेला नाही. मुलीने चित्रामध्ये दाखवलेला हा तिसरा हात तिच्याच वडिलांचा आहे. यानंतर मुलीने आणखी एक चित्र काढलं, या चित्रात मुलगी आईला अग्नी देत असल्याचं तिने दाखवले आहे. वडील आईच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत म्हणून आपल्यालाच अंत्यसंस्कार करायला लागल्याचं मुलीने या चित्रातून सांगितले.

मुलीच्या वडिलांचे नाव संदीप बुधौलिया आहे. सोनाली आणि संदीप या दोघांचे 27 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न झाले. लग्नामध्ये सोनालीच्या वडिलांनी संदीपला 20 लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता, पण संदीपला हुंड्यासोबत गाडीही पाहिजे होती. गाडी मिळाली नाही म्हणून सोनालीवर सासरी अत्याचार सुरू होते. 14 फेब्रुवारीला मामाच्या मुलाचे लग्न असल्यामुळे सोनाली मुलीसोबत 12 फेब्रुवारीलाच घरातून गेली. लग्नाच्या एक दिवसानंतर संदीपने सोनालीला फोन केला आणि आज घरी आली नाहीस तर परत कधीही येऊ नकोस, अशी धमकी दिली. यानंतर सोनाली 16 फेब्रुवारीला घरी आली. यानंतर 17 फेब्रुवारीला सकाळी संदीपने सोनालीच्या माहेरी फोन करून, तिने जीवन संपवले असल्याचं सांगितले.

मुलीचा मृत्यू झाल्याचं समजताच सोनालीचे आई-वडील झांसीला आले. रोजच्या भांडणाला कंटाळून सोनालीने जीवन संपवल्याचे तिच्या आई-वडिलांना सांगण्यात आले. संदीपने पोलिसांनाही हेच सांगितले. पण तेव्हाच चार वर्षांच्या नातीने आजी-आजोबांना चित्राच्या माध्यमातून सगळं सत्य सांगितलं. हे चित्र पाहून आजी-आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली.

चिमुकलीने चित्राच्या माध्यमातून सगळं सांगितलं तोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता. सोनालीचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचे रिपोर्टमध्ये लिहिले होते. पोलिसांनीही मुलीला विश्वासात घेऊन या चित्राचा अर्थ विचारला. तसेच चित्रातला तिसरा हात कुणाचा आहे? असा प्रश्न पोलिसांनी मुलीला विचारला. यानंतर मुलीने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

संदीपने 16 फेब्रुवारीच्या रात्री सोनालीला बेदम मारहाण केली, यानंतर गळा घोटून तिची हत्या केली. सोनालीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह पंख्याला लटकवला आणि सोनालीने स्वत:च आयुष्य संपवले, असा बनाव रचला. चार वर्षांची आपली मुलगी झोपली असल्याचे संदीपला वाटत होते, पण मुलगी सगळं बघत होती आणि अखेर मुलीनेच चित्र काढून या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हलक्या काळजाचे असाल तर यष्टिका आचार्य हिचा जिममधील Video पाहू नका…

लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…

धक्कादायक! बदला घेण्यासाठी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केली निर्घृणपणे हत्या…

धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…

धक्कादायक! दाजीसोबत अल्पवयीन मेहुणीला शरीरसंबंध ठेवण्यास पाडलं भाग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!