
धक्कादायक! मित्रांसोबत मस्करी करणे बेतले महिलेच्या जीवावर…
मुंबईः मित्रांसोबत मस्करी करताना एका महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. गीनादेवी मंजिराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती. मृत महिला पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि तोल गेल्याने क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली.
याचवेळी तिच्यासोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला, मात्र त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचवले. या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. महिलेच्या अकस्मात मृत्यूमुळे खळबळ माजली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…
पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…
धक्कादायक! पुणे शहरात दोन अल्पवयीन मुली एकत्र प्यायल्या दारू अन् पुढे…
मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

