
आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करत घेतली थपथ अन् काही महिन्यातच…
नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली आहे. अलीकडेच सक्षमच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे.
जात वेगळी असल्यामुळे मामीडवार कुटुंबीयांना आचल आणि सक्षम ताटेचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे आचलचे वडील आणि भावांनी सक्षम ताटे याची गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून हत्या केली होती. यानंतर आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली आहे. अलीकडेच सक्षमच्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या पडलेल्या सक्षम ताटेच्या आईची अवस्था वाईट झाली आहे.
View this post on Instagram
सक्षमची आई संगीता ताटे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, सक्षमची हत्या झाली होती, तेव्हा आंचल म्हणाली होती, ‘मम्मी, सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे. तुमच्यासोबतच राहीन. तुमची काळजी घेईन. ती साडेतीन महिने सोबत राहिली. एक दिवस अचानक म्हणाली- ‘आजीची तब्येत खूप खराब झाली आहे. मला त्यांना भेटायला जायचे आहे’. इथून काही अंतरावर तिचं घर आहे. मी तिला पोहोचवून आले. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आजीकडे जाण्यापूर्वी आंचल सोशल मीडियावर आपल्या काकांच्या संपर्कात होती. ती काय बोलायची? कुणाशी बोलायची? यावर आम्ही काहीही बंधनं ठेवली नव्हती. पण त्यानंतर ती घरी निघून गेली आणि परत आली नाही. यानंतर सक्षमच्या वडिलांची देखील प्रकृती ढासळत गेली. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. सध्या आंचलसोबत आपला कसलाही संपर्क नाही.’
दरम्यान, सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार सोबत प्रेमसंबंध होते. याच वादातून आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केली होती. आंचल मामीडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले होते. यावेळी आंचलने म्हटले होते की, ‘मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन. मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहण्याचे सांगितले होते.’
नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…
नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…
प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…
कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

