
महिलेला अंघोळ करताना पाहण्यासाठी छतावर चढला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक महिला घराच्या अंगणात अंघोळ करत होती. तिला महिलेला पाहण्यासाठी एक व्यक्ती नशेतच घराच्या छतावर चढला होता. परंतु, छतावरून पडून मद्यपीचा मृत्यू झाल्याची घटना झाशी येथे घडली आहे. मात्र, काही लोकांनी या तरुणाला छतावरून ढकलल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा, आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते. घरा शेजारी राहणारी एक महिला घराच्या अंगणात आडोश्याला अंघोळ करत होती. यावेळी संबंधित युवक हा घराच्या छतावर चढला आणि महिलेला आंघोळ करताना पाहू लागला. ही बाब शेजारच्या मुलाच्या लक्षात येताच तो सुद्धा छतावर चढला. दरम्यान, महिलेच्या मुलाला टेरेसवर आल्याचे पाहून दारूच्या नशेत असलेला युवक घाबरला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे.
दरम्यान, युवक छतावरून खाली पडल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी गोंधळ सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…
प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…
धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार…
प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…

